Aarey Colony Tree Cutting | मेट्रोसाठी ‘आरे’तील २,५०० झाडे काढण्याचा पुन्हा प्रस्ताव

न्यायालयाची स्थगिती रद्द होताच हरकती-सूचना मागविल्या

मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरे वसाहतीतील तब्बल अडीच हजार झाडे कापण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएने पुन्हा एकदा पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवला आहे. झाडे कापण्यासाठी परवानगी देण्याबाबत न्यायालयाने वृक्ष प्राधिकरणावर घातलेली स्थगिती उठवल्यानंतर लगेचच एमएमआरडीएने पालिकेकडे हा प्रस्ताव पाठवला आहे. पालिका प्रशासनाने या प्रस्तावावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या असून ८ जुलैला एमएमआरडीएच्या कार्यालयात त्यावर सुनावणी होणार आहे.

आरे वसाहतीत मेट्रोच्या कारशेडसाठी अडीच हजार झाडे काढण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवला होता. मात्र त्यावर घेण्यात आलेल्या सुनावणीवर आक्षेप घेत न्यायालयाने या प्रकरणी पुन्हा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, प्राधिकरणात तज्ज्ञ व्यक्ती नसल्यामुळे न्यायालयाने झाडे कापण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यास स्थगिती दिली होती. नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान ही स्थगिती उठवण्यात आली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी एमएमआरडीएने आपला जुना प्रस्ताव पुन्हा पाठवला आहे. झाडे कापण्याच्या अन्य प्रस्तावांची सुनावणी पालिकेच्या उद्यान अधीक्षकांच्या दालनात पार पडत असते. मात्र आरे वसाहतीतील झाडे कापण्याच्या प्रकरणाची सुनावणी ८ जुलै रोजी एमएमआरडीएच्या वांद्रे येथील कार्यालयात दुपारी ३ वाजता पार पडणार आहे.

वृक्ष प्राधिकरणमध्ये तज्ज्ञ नसल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते झोरू भतेना यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. काही झाडांची कत्तल, तर काहींचे पुनरेपन  : मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरे वसाहतीतील सुमारे २,७०२ झाडे काढण्यात येणार आहेत. २२३८ झाडे कापावी लागणार आहेत. तर ४६४ झाडे पुनरेपित केली जाणार आहेत. या जागेवर एकूण ३,६९१ झाडे आहेत. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास त्यापैकी केवळ १००० झाडेच शिल्लक राहणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.

First Published on July 1, 2019 12:52 am

Web Title: aarey colony tree cutting




Bollywood News

The post Aarey Colony Tree Cutting | मेट्रोसाठी ‘आरे’तील २,५०० झाडे काढण्याचा पुन्हा प्रस्ताव appeared first on Viral Trending Content.



from WordPress https://ift.tt/2KPKqqJ
via IFTTT

Comments